एमटीडीसी बोट क्लब गणपतीपुळे

गणपतीपुळे, महाराष्ट्र, 415615

एमटीडीसी बोट क्लब गणपतीपुळे

गणपतीपुळे, महाराष्ट्र, 415615

सविस्तर

कामाची कटकट, घड्याळाची टिकटिक, ट्रेनचा थकवणारा प्रवास आणि रोजच्या डेडलाईन्स, या सगळ्यातून एक छोटी विश्रांती मिळावी अशी इच्छा प्रत्येकाची इच्छा असतेच हो ना ?, नाही म्हणूच नका! या इच्छापूर्तीसाठी एमटीडीसीने गणपतीपुळे येथे अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या बोट क्लब मध्ये प्रत्येक प्रकारच्या पर्यटकाला एक परिपूर्ण अनुभव मिळेल,त्यात गणपतीपुळेच्या सौंदर्याबाबत नव्याने सांगण्याची गरज नाहीच! 


लाल माती, नारळी पोफळीची झाडं, गार वारा आणि प्रत्यक्ष बाप्पाचं वरदान लाभलेल्या या कोकणातील पर्यटनस्थळी 2020 मध्ये या बोट क्लब उपक्रमाचे उदघाटन झाले. उत्तम स्थितीत असणाऱ्या या बोट मधून एक सुरक्षित तरीही साहसी व थरारक सफारीचा आनंद आपण घेऊ शकाल. तुमच्या मित्र किंवा कुटुंबासह इथे घालवलेला एक दिवस तुमचा वर्षभराचा थकवा घालवून उत्साह देऊन जाईल. जेट स्की ते पॅरासेलिंग ते कायकिंग, आरामदायक लेक क्रूझ किंवा चौपाटीवरील पारंपरिक झोपडी मध्ये आराम असं अजून बरंच काही तुमची वाट पाहतेय. इतकेच नाही तर आमच्या बीच शॅक वर आपण समुद्राचे सुंदर देखावे बघत संध्याकाळ देखील घालवू शकता. तुम्ही फक्त दिनांक ठरवा! 


हवाई मार्गे:

जवळील विमानतळ: रत्नागिरी विमानतळ(27 किमी)

रेल्वे मार्गे:

जवळील रेल्वे स्थानक: रत्नागिरी रेल्वे स्थानक (30 किमी)


फोटो गॅलरी

सोयी सुविधा

बीच शॅक
पोशाख बदलण्याची खोली
स्नानगृह
उपहारगृह
पार्किंग

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

कसे पोहचाल?

हवाई मार्गे:

जवळील विमानतळ: रत्नागिरी विमानतळ(27 किमी)

रेल्वे मार्गे:

जवळील रेल्वे स्थानक: रत्नागिरी रेल्वे स्थानक (30 किमी)

उपक्रम

एमटीडीसी बोट क्लब मध्ये खालीलपैकी कितीही आणि कोणतेही अनुभव आपण निवडू शकता: 

  • जेट स्की
  • बनाना बोट
  • स्पीड बोट
  • बम्पर राईड
  • बोट राईड
  • कायकिंग
  • पॅरासेलिंग

कपडे बदलण्याची खोली

बाथरूम

बीच शॅक

चौपाटीवर टुमदार झोपडी

उपहार गृह

पार्किंग

खवय्येगिरी

साहसी खेळ खेळून थकल्यावर आमच्या ताविष या उपाहारगृहामध्ये खवय्यांसाठी खालील पदार्थ उपलब्ध आहेत: