बोर्डी डहाणू

पालघर

डहाणूमधील मुख्य पर्यटन आकर्षण म्हणजे डहाणू-बोर्डी किनारा. हा चिकू आणि अन्य फळांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात देखील संपूर्ण किनाऱ्यावर थंडगार वारे वाहत असल्याने अनेक मुंबईकरांची वीकेंड सुट्टी या किनारी ठरलेलीच असते. हे हरित क्षेत्र असल्यामुळे शहरीकरणापासून मुक्त आहे. गोंगाटापासून दूर आणि चोहीकडे हिरवळ असल्याने इथे निवांत क्षण घालवायला एकदा तरी यायलाच हवे. जवळपास 17 किमी वर पसरलेल्या समुद्रकिनारी चालताना एका बाजूला खारफुटीची वने आणि दुसरीकडे अथांग समुद्र असे मोहक दृश्य पाहायला मिळते.


डहाणूजवळील बहरोट लेण्यांमध्ये स्थित देशातील एकमेव झोरोस्टेरियन गुहा मंदिर व हजारो वर्षांपासून तेवत असलेली इराण शाह ज्योत ही नक्की भेट द्यावी अशी ठिकाणे आहेत. रामायण मालिकेचे चित्रण झालेल्या उंबरगाव येथील प्रसिद्ध वृंदावन स्टुडिओला आपणही आवर्जून भेट द्यावी. सकाळी सूर्योदय आणि सायंकाळी सूर्यास्त पाहत आपण एक दिवसाची छोटी सहल पूर्ण करू शकता.


ऑक्टोबर - मार्च

(हिवाळा)


हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (127 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, डहाणू 

मुंबईहून 155 किमी (एनएच 3 आणि एनएच 8 मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

डहाणू रोड ( 3 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

ऑक्टोबर - मार्च

(हिवाळा)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (127 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, डहाणू 

मुंबईहून 155 किमी (एनएच 3 आणि एनएच 8 मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

डहाणू रोड ( 3 किमी)

उपक्रम

बोर्डी डहाणू समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा: 

  • पोहणे
  • कोवळ्या सूर्यकिरणांत न्हाऊन जा
  • चिकू बागांना भेट द्या
  • उंट सफारी

झई गाव

अस्वली धरण

कल्पतरू बॉटॅनिकल गार्डन

वृंदावन स्टुडिओ

घोलवड

डहाणू किल्ला

नरपड समुद्रकिनारा

मल्लिनाथ जैन तीर्थ कोसबाड मंदिर

असे पूरवा जिभेचे चोचले

बोर्डी-डहाणू येथील सुरमई- पापलेट थाळी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे, या जोडीला सोलकढी चाखायला विसरु नका. अनेक पारंपरिक आणि छोटेखानी उपहारगृहात अलगद जिभेवर विरघळणारे मोदकही मिळतात.