दिवेआगर

रायगड

बीच बद्दल

रायगड मधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे थंडीच्या महिन्यात नंदनवनासारखे बहरून जाते. याठिकाणी अलीकडे अनेक साहसी खेळ देखील प्रसिद्ध झाले आहेत, किनाऱ्यावर पाणी उडवत घोड्यावरून रपेट मारायला जाणे असो किंवा पॅरासाईलिंग, बनाना बोट राइड, स्लीपर बोट राइड सारख्या थरारक खेळांचा आनंद घेणे असो हे सर्व रोमहर्षक क्षण इथे तुम्ही अनुभवू शकता. एकीकडे कोळीबांधवांचा उत्स्फूर्तपणे काम करत असण्याचा नजारा तर दुसरी कडे पांढऱ्या शुभ्र सीगलचे थवे नक्कीच आपले मन जिंकतील. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात.


ऑक्टोबर - डिसेंबर

(हिवाळा)


हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (103 किमी)



रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, दिवेआगर (36 km किमी)

पुण्यापासून 159 किमी (ताम्हणी घाट मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

माणगाव ( 30 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

ऑक्टोबर - डिसेंबर

(हिवाळा)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (103 किमी)



रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, दिवेआगर (36 km किमी)

पुण्यापासून 159 किमी (ताम्हणी घाट मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

माणगाव ( 30 किमी)

उपक्रम

दिवेआगर समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • स्वच्छ समुद्रात पोहण्याचा आनंद घ्या
  • सूर्याच्या कोवळ्या किरणात न्हाऊन निघा
  • जीप पॅरासेलिंग
  • बनाना बोट राइड
  • घोडेस्वारी
  • मोटर बोटिंग
  • सूर्यास्त आणि सूर्योदय पहा
  • पवित्र मंदिरांना भेट द्या

जंजिरा किल्ला

पद्मदुर्ग किल्ला

दिवेगर बीच

रूपनारायण मंदिर

हरिहरेश्वर चौपाटी

फणसाड वन्यजीव अभयारण्य

भगवान सुवर्णगणेश मंदिर

शंकर मंदिर

असे पुरवा जिभेचे चोचले

येथील मोदक, कोकणी मसाले, पापड, मिरगुंड, पोह्याचे पापड, कडवे वाल, कोळंबी थाळी, खेकड्याचं कालवण, सोलकढी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.