गणपतीपुळे

रत्नागिरी

सविस्तर

राज्यातील मोजक्या पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यांपैकी एक असलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा येथील 400 वर्ष जुन्या स्वयंभू गणपती मंदिरामुळे पर्यटक व भाविकांना आकर्षित करतो. दुतर्फ़ा हिरवीगर्द झाडी असणारे रस्ते, लाल माती आणि श्रीगणेशाचा वरदहस्त असणारे हे पर्यटनस्थळ अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. इतकेच नाही तर हे भारतातील मोजक्या अश्या मंदिरापैकी एक आहे जिथल्या दैवताचे मुख पश्चिमेकडे आहे आणि म्हणूनच इथल्या बाप्पाला पश्चिमेचा द्वारपालक म्हणूनही मानले जाते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांनी जेव्हा येथील किनारा व मंदिर न्हाऊन निघते, तो एक क्षण आपल्याला निसर्गाची किमया पटवून देईल. मंदिरात जाऊन आपल्या मनाला शांती मिळताच त्याच्या अगदी उलट टोकाचा साहसी अनुभव घेण्यासाठी थेट समुद्रकिनारा गाठून आपण जेट स्कीइंग, स्पीड बोटिंग, एटीव्ही बाईकवरुन सफर असे चित्तथरारक खेळ खेळू शकाल.



हिवाळा (ऑक्टोबर - मार्च )


हवाई मार्गे:

रत्नागिरी  विमानतळ (50 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, गणपतीमुळे (900 मी)

रत्नागिरीहून 25 किमी (आरे वारे रस्त्यामार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

रत्नागिरी (50 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा (ऑक्टोबर - मार्च )

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

रत्नागिरी  विमानतळ (50 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, गणपतीमुळे (900 मी)

रत्नागिरीहून 25 किमी (आरे वारे रस्त्यामार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

रत्नागिरी (50 किमी)

उपक्रम

गणपतीपुळे समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • गणपतीपुळे मंदिरात दर्शन
  • जेट स्कीइंग
  • स्पीड बोटिंग
  • घोडेस्वारी
  • उंट सफारी
  • एटीव्ही बाईकिंग

मॅजिक गार्डन

पतित पावन मंदिर

आरे वारे समुद्र किनारा

मालगुंड समुद्र किनारा

थिबा वाडा

प्राचीन कोकण संग्रहालय

गणपतीपुळे समुद्र किनारा

स्वामी स्वरूपानंद समाधी मठ

असे पुरवा जिभेचे चोचले

गणपतीपुळे समुद्रकिनारी आपल्याला माशाचं कालवण, कोकम कढी, आमरस (उपलब्धतेनुसार) हे पदार्थ अगदी कोणत्याही हॉटेल मध्ये चविष्टच मिळतील. गणपतीपुळे देवस्थानाला भेट दिल्यावर बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक खायलाही विसरू नका. उन्हाळ्याच्या आसपास सहलीला जाणार असाल तर आंबापोळी, फणसाची साटं, (पोळी), हे पदार्थही आवर्जून चाखून पहा.