गुहागर

गुहागर

सविस्तर

प्राचीन मंदिरे, नारळ पोफळीच्या बागा, सुपारीच्या बागा, हापूस आंबे यासाठी प्रसिद्ध असे गुहागर हे कोकणाचे वैभव आहे. शहराच्या मध्यभागी, आपल्याला 12 व्या शतकातील शिव मंदिर, व्याडेश्वर ही प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील. श्री विष्णू , विघ्नहर्ता श्रीगणेश, माता पार्वती, आणि माता लक्ष्मीच्या या मंदिराभोवती वेगळी चार लहान मंदिरे देखील आहेत. प्राचीन दुर्गादेवी मंदिर हे काही अंतरावर असले तरी वास्तुकलेचे हे सुबक उदाहरण आहे त्यामुळे येथेही भेट द्यायला विसरू नका . मंदिराची धार्मिक सहल झाल्यावर मग दिवस अखेरीस समुद्रकिनारी बसून, पायाला स्पर्शून जाणाऱ्या लाटांची गंमत अनुभवत अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे नेत्रसुखद दृश्य आपण पाहू शकता.


हिवाळा (नोव्हेंबर - मार्च )


हवाई मार्गे:

रत्नागिरी विमानतळ (86किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, गुहागर (1 किमी)

रत्नागिरीहून 89 किमी (एसएच 106 मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

चिपळूण ( 34 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा (नोव्हेंबर - मार्च )

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

रत्नागिरी विमानतळ (86किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, गुहागर (1 किमी)

रत्नागिरीहून 89 किमी (एसएच 106 मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

चिपळूण ( 34 किमी)

उपक्रम

गुहागर समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • किनाऱ्यावर निवांत बसून सूर्यास्त पहा
  • मंदिरांचे दर्शन
  • घोडेस्वारी
  • उंट सफारी

श्री व्याडेश्वर देवस्थान

दुर्गा देवी मंदिर

वेळणेश्वर

हेदवी

जयगड

दाभोळ

असे पुरवा जिभेचे चोचले

गुहागर येथे समुद्रकिनारी ताज्या माशांचे कालवण आणि थाळ्या प्रसिद्ध आहेतच मात्र त्याच्या तोडीसतोड अशी जीवाची तहान भागवणारी अनेक पेये सुद्धा येथे बरीच प्रसिद्ध आहेत. ताजी शहाळी, कोकम सरबत, कैरी पन्हे आणि सोलकढी प्यायल्यावर तुमच्या मनाला थंडावा मिळेल हे निश्चित!