हरिहरेश्वर

कोकण

सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. महाराष्ट्रातील रमणीय शांत समुद्र किनाऱ्यांची यादी हरिहरेश्वर किनाऱ्याची गणना केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही . डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की भगवान श्रीविष्णूंच्या पावन चरणांनी ही भूमी समृद्ध झाली आहे, ही जरी धार्मिक मान्यता असली तरी याठिकाणी भेट दिल्यावर एक अद्भुत शांती कोणालाही अनुभवता येईल, त्यामुळे खरोखरच निसर्गाचा या ठिकाणावर वरदहस्त आहे असे म्हणण्यात काहीच हरकत नाही. इथे फार साहसी खेळ नाहीत किंवा माणसांची गर्दीही नाही, स्वतःसोबत चार क्षण घालवू इच्छिताय? तर हा समुद्रकिनारा तुमची वाट पाहतोय!


हिवाळा व पावसाळा (ऑगस्ट- फेब्रुवारी)


हवाई मार्गे:

पुणे विमानतळ (150 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, माणगाव (60 किमी)

पुण्याहून  171  किमी (ताम्हिणी घाट मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

कोलाड ( 82 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा व पावसाळा (ऑगस्ट- फेब्रुवारी)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

पुणे विमानतळ (150 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, माणगाव (60 किमी)

पुण्याहून  171  किमी (ताम्हिणी घाट मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

कोलाड ( 82 किमी)

उपक्रम

हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • समुद्र किनाऱ्यावर बसून निवांत सूर्यास्त पहा
  • मंदिरांना भेट द्या
  • जहाजातून सफर

बनकोट किल्ला

वेळास बीच

श्रीवर्धन बीच

काळभैरव मंदिर