हर्णे- मुरुड

दापोली

हर्णे आणि मुरुड ही दोन टुमदार शहरे स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. हर्णे समुद्रकिनारा हा मच्छीमारांसाठी मोक्याचे ठिकाण आहे, येथे मासळी पकडून किनाऱ्यालगतच्या बाजारात तिचा लिलाव केला जातो, याठिकाणी खरेदीच्या निमित्ताने तशी बरीच गर्दी असते म्हणूनच आपल्याला जर एकांत अनुभवायचा असेल तर मुरुड समुद्रकिनारा आपल्यासाठी अधिक उत्तम ठरेल. याच कारणाने अनेक जलतरणपटू देखील येथे सरावासाठी येत असतात. 


हर्णे बंदरापाशीच सुवर्णदुर्ग व कनकदुर्ग हे समुद्रीकिल्ले मोठ्या दिमाखात उभे आहेत, मुरुडचे दुर्गादेवी मंदिर आणि आंजर्ले टेकडीवरील गणपती मंदिर भाविकांना खास आकर्षित करते. आंजर्ले या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या समुद्रकिनारी एप्रिलमध्ये कासव महोत्सव आयोजित केला जातो, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्राच्या दिशेने पडणारं पहिलं पाऊल पाहण्याचा हा अनुभव खरोखरच विलक्षण असतो. 


हिवाळा (ऑक्टोबर - मार्च )


हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (228 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, मुरुड  (हरणाईहुन 6 किमी)

रत्नागिरीहून 160 किमी (एसएच 96 मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

खेड ( 34 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा (ऑक्टोबर - मार्च )

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (228 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, मुरुड  (हरणाईहुन 6 किमी)

रत्नागिरीहून 160 किमी (एसएच 96 मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

खेड ( 34 किमी)

उपक्रम

हर्णे- मुरुड समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • पोहणे
  • पॅरासेलिंग
  • स्पीड बोटिंग
  • घोडेस्वारी
  • उंट सफारी
  • एटीव्ही बाईकिंग
  • योग असल्यास डॉल्फिन दर्शनही होईल, बारकाईने पहा

सुवर्णदुर्ग किल्ला

कनकदुर्ग किल्ला

गोवा किल्ला

आंजर्ले समुद्रकिनारा

आंजर्ले गणेशमंदिर

केळशी

असे पुरवा जिभेचे चोचले

येथील ताज्या माश्यांचं कालवण आणि सोबत सोलकढी खाऊन तृप्तीचा ढेकर दिल्यावर तुम्ही खऱ्या अर्थाने कोकणाची मजा अनुभवाल. याशिवाय कैरी पन्हे, आंबा पोळी, फणसाचे तळलेले गरे किंवा पोळी, कोकम सरबत यांचाही आस्वाद घ्यायला विसरू नका.