किहीम

अलिबाग

सविस्तर

किहीम हे अलिबागच्या उत्तरेस स्थित गाव विलक्षण पार्श्वभूमी आणि स्वच्छ वातावरणासह हिरव्यागार आणि रंगीबेरंगी वन्य फुलांनी व त्यांच्या ओढीने येणाऱ्या नानाविध पक्ष्यांनी समृद्ध आहे. काळभैरव मंदिरात दर्शन व त्यानंतर किनारपट्टीवरील समुद्राच्या लाटांचा आनंद घेत एक छोटी सुट्टी आपण इथे नक्कीच आयोजित करू शकता. मोटारबाईकिंग, पॅराग्लाइडिंग, बनाना राईड असे साहसी खेळ येथे अलीकडेच खूप प्रसिद्ध झाले आहेत. या ठिकाणी वर्षभर निसर्ग प्रसन्नच असला तरी वर्षाअखेरीस म्हणजेच हिवाळ्यात येथे रंगीबेरंगी फुलपाखरांची जणू काही जत्राच भरते, हे सारे काही मुंबई पुण्याहून अगदी हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे कामाच्या धबडग्यातून विश्रांती हवी तर थेट अलिबाग गाठा!


हिवाळा (नोव्हेंबर - मे)


हवाई मार्गे:

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (100 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, अलिबाग (10 किमी)

मुंबईहून 96 किमी (एनएच 66 मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

पेण ( 31 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा (नोव्हेंबर - मे)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (100 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, अलिबाग (10 किमी)

मुंबईहून 96 किमी (एनएच 66 मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

पेण ( 31 किमी)

उपक्रम

किहीम समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • सूर्यकिरणात न्हाऊन निघा
  • बनाना राईड
  • जेट स्कीइंग
  • पॅराग्लाइडिंग
  • पॅरासेलिंग
  • मोटारसायकल चालविणे
  • रात्री कॅम्पिंग दरम्यान तारे पाहणे

आवास समुद्र किनारा

वरसोली समुद्र किनारा

कोलाबा किल्ला

काळभैरव मंदिर

किहीम समुद्र किनारा

कनकेश्वर देवस्थान मंदिर

श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर

अलिबाग समुद्र किनारा

असे पुरवा जिभेचे चोचले

कोकणी- मालवणी या दोन्ही शैलीची चव किहीम समुद्र किनारी चाखायला मिळते, कोळंबीचा झणझणीत रस्सा, चटपटीत सोलकढी, काजूची फेणी व माश्यांचं कालवण या पदार्थांना कुठेच तोड नाही