श्रीवर्धन

रायगड

शहराच्या गोंगाटापासून दूर, निर्जन स्थळी जाऊन काही क्षण का होईना राहावं अशी जवळपास प्रत्येक चाकरमान्याची इच्छा असते, त्या सर्वांसाठी हा निवांत श्रीवर्धन किनारा एक अनमोल खजिना आहे. स्वच्छ पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा व लाटांचा आवाज तुम्हाला स्वतःशी जोडले जाण्यास मदत करेल.


पर्यटनाच्या बाबतही श्रीवर्धन अत्यंत समृद्ध आहे. येथील लक्ष्मी नारायण मंदिर, सुवर्ण गणेश मंदिर, जवळच असलेले हरिहरेश्वर आणि दिवेआगर व अन्य समुद्रकिनारे तुमचा सर्व थकवा बाजूला सारत निसर्गाचे मनोहर रूप दाखवतील.श्रीवर्धनची एक ऐतिहासिक ओळख म्हणजे हे पेशव्यांचे मूळ गाव, याठिकाणी अजूनही पेशवेकालीन बऱ्याच वास्तू आणि मंदिरे पाहायला मिळतात. त्यामुळे जर का कामाच्या धबडग्यातून काही दिवस सुटका हवी असेल तर या सहलीचं नियोजन सुरु करा.


ऑक्टोबर - मार्च

(हिवाळा)


हवाई मार्गे:

पुणे विमानतळ (167 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, श्रीवर्धन 

पुण्यापासून 165 किमी (ताम्हणी घाट मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

माणगाव ( 30 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

ऑक्टोबर - मार्च

(हिवाळा)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

पुणे विमानतळ (167 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, श्रीवर्धन 

पुण्यापासून 165 किमी (ताम्हणी घाट मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

माणगाव ( 30 किमी)

उपक्रम

श्रीवर्धन समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • पॅराग्लाइडिंग
  • सर्फिंग
  • योग असल्यास डॉल्फिन दर्शनही होईल, बारकाईने पहा

काळभैरव मंदिर

हरिहरेश्वर किनारा

हरिहरेश्वर मंदिर

गणेश गल्ली

बॅंकन किल्ला

वेळास चौपाटी

दिवेआगर बीच

असे पुरवा जिभेचे चोचले

श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर बरीच उपहारगृहे आहेत ज्यात कोकण किनारपट्टीवरील अस्सल चव चाखायला मिळते, यात मुख्यतः खेकडे, ताजे मासे पर्यटकांची पसंती ठरतात तर शाकाहारी मंडळींमध्ये सोलकढी व काजूची भाजी हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.