वेळास

वेलास आगर

सविस्तर

मदनगड किंवा दापोली येथून हाकेच्या अंतरावर स्थित छुपा खजिना म्हणजे वेळास समुद्रकिनारा. डोंगररांगा व कडेला हा स्वच्छ, सुंदर किनारा असे नेत्रसुखद दृश्य येथे पाहायला मिळते. सामन्यातः समुद्रकिनारी माणसांची गर्दी आपण पाहिली असेल पण या किनाऱ्याचे वैशिष्ट्य असे की इथे चक्क कासवांची जत्रा भरते. मागील कित्येक वर्षे फेब्रुवारी पासून एप्रिलच्या मध्यापर्यंत, वेळास समुद्रकिनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासव गर्दी करतात. 


थंडगार बेभान वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी मेजवानी! या सहलीचं नियोजन करण्यासाठी आणखी काही कारणं हवीत का?  


हिवाळा (ऑक्टोबर - मार्च )


हवाई मार्गे:

 पुणे विमानतळ (168 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, दिवेआगर 

पुण्यापासून 191 किमी (ताम्हणी घाट मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

चिपळूण ( 107 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा (ऑक्टोबर - मार्च )

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

 पुणे विमानतळ (168 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, दिवेआगर 

पुण्यापासून 191 किमी (ताम्हणी घाट मार्गे)

जवळचे रेल्वे स्थानक:

चिपळूण ( 107 किमी)

उपक्रम

वेळास समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • बाणकोट किल्ल्यावर ट्रेक
  • समुद्र किनारी सूर्यास्त पहा
  • कासव महोत्सव (हंगामी)

बनकोट किल्ला

हरिहरेश्वर बीच

दिवेआगर बीच

आमराई

असे पुरवा जिभेचे चोचले

वेळास समुद्रकिनाऱ्यावर कोकणची अस्सल चव चाखायला मिळते, यात मुख्यतः कच्च्या काजूंची भाजी, चिकन वडे, सोलकढी हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.