वेळणेश्वर

रत्नागिरी

बीच बद्दल

महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांची यादी पाहायची झाली तर चंद्रकोरीच्या आकाराचा, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला वेळणेश्वर किनारा हा एक दडलेला हिरा म्हणता येईल. इथल्या मऊशार वाळूच्या किनाऱ्यावर आपण कुटुंबासह सहलीची मजा घेऊ शकता, इथले पाणी इतके स्वच्छ आहे की त्वचेच्या समस्या किंवा अन्य कोणताही किंतु मनात न बाळगता इथे बिनधास्त पोहू शकता. 


कला रसिक आणि वास्तुकलेच्या अभ्यासकांसाठी व शिवभक्तांसाठी किनाऱ्यावर वसलेल्या वेळणेश्वर मंदिराची भेट एक अद्भुत आनंद ठरेल. निळ्या, पिवळ्या व गुलाबी रंगाच्या छटांच्या रंगांनी सजलेल्या या शिवमंदिराची स्थापना अंदाजे 1200 वर्षांपूर्वी झाली होती .महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव आयोजित केला जातो.


नोव्हेंबर - फेब्रुवारी

(हिवाळा)


हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (290 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, गुहागर (15 km किमी)

कोल्हापारपासून 200 कि.मी. (कराड मार्गे - चिपळूण रोड)

जवळचे रेल्वे स्थानक:

चिपळूण (65 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

नोव्हेंबर - फेब्रुवारी

(हिवाळा)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (290 किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, गुहागर (15 km किमी)

कोल्हापारपासून 200 कि.मी. (कराड मार्गे - चिपळूण रोड)

जवळचे रेल्वे स्थानक:

चिपळूण (65 किमी)

उपक्रम

वेळणेश्वर समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा:

  • स्वच्छ समुद्रात पोहण्याचा आनंद घ्या
  • सूर्याच्या नाजूक किरणात न्हाऊन निघा
  • रात्री तारे पाहत कॅम्पिंग
  • पवित्र मंदिरांना भेट द्या

वेळणेश्वर मंदिर

दुर्गा देवी मंदिर

व्याडेश्वर मंदिर

जय विनायक मंदिर, जयगड

जयगड लाइटहाऊस

असे पुरवा जिभेचे चोचले

मालवणी मेजवानी म्हणजे वेळणेश्वरचा आत्मा, त्यामुळे या सहलीत खालील पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या