वेंगुर्ला

कोकण

सविस्तर

वेंगुर्ला हे करवंद, आंबा आणि काजूच्या उत्पादनातील एक महत्वाचं शहर आहे, मात्र इतकीच या शहराची ओळख नसून येथील रमणीय समुद्रकिनारा या शहरास लाभलेला एक समृद्ध वारसाच म्हणता येईल. सर्जेश्वर शिव मंदिर, खजाना देवी मंदिर या प्राचीन मंदिराच्या देवभूमीला 17 व्या शतकात दोनदा जाळण्यात आले होते आजही या हल्ल्याचे ज्वलंत पुरावे वेंगुर्ला किनाऱ्यावरील खडकांवर दिसतात. भारतीय स्विफ्टलेट पक्ष्यांच्या हव्याहव्याश्या गजबजाटाने हा किनारा प्रसन्न भासतो, धुक्याची चादर ओढलेला वेंगुर्ल्यातील हिवाळा हा खरोखरच प्रत्येकाने घ्यावा असा अनुभव आहे. 


स्वच्छ समुद्र किनाऱ्यावरील हिऱ्यासारख्या लखलखत्या स्वच्छ पाण्यावरून पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, स्कूबा डायव्हिंग, मासेमारी असे अनेक अनुभव खूप विलक्षण असतात. 


आमच्याकडून एक खास टीप: इथे गेलात की सर्वात आधी भाजलेला काजू आणि काजूच्या मिठाईचा सर्वात आधी आस्वाद घ्या. मंडळी त्या चवीला तोड नाही! 


हिवाळा (नोव्हेंबर - फेब्रुवारी)


हवाई मार्गे:

दाबोलीम विमानतळ (86किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, वेंगुर्ला (2.3 किमी)

कोल्हापूरहून 173  किमी (एनएच 548 एच मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

सावंतवाडी ( 20 किमी)


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

सहलीसाठी उचित काळ:

हिवाळा (नोव्हेंबर - फेब्रुवारी)

कसे पोहोचाल:

हवाई मार्गे:

दाबोलीम विमानतळ (86किमी)

रस्ते मार्गी:

सर्वात जवळचे बसस्थानक, वेंगुर्ला (2.3 किमी)

कोल्हापूरहून 173  किमी (एनएच 548 एच मार्गे)



जवळचे रेल्वे स्थानक:

सावंतवाडी ( 20 किमी)

उपक्रम

वेंगुर्ला समुद्रकिनारी एक परिपूर्ण सहल अनुभवण्यासाठी या गोष्टी नक्की करा: 

  • नौकाविहार
  • पोहणे
  • स्कुबा डायव्हिंग
  • पॅरासेलिंग
  • बनाना बोट
  • बम्पर राइड
  • योग असल्यास डॉल्फिन दर्शनही होईल, बारकाईने पहा
  • रॉडने मासेमारी

शिरोडा समुद्रकिनारा

वेंगुर्ला समुद्रकिनारा

खजाना देवी मंदिर

सर्गेश्वर शिवमंदिर

निवती समुद्रकिनारा

डच फॅक्टरी

वेंगुर्ला लाईटहाऊस

तेरेखोल किल्ला