अडासा गणपती

अडासा

सविस्तर

नागपूर जवळील अडासा गावात वसलेले अडासा गणपती हे देवस्थान विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. असे मानले जाते की हे मंदिर 4000 वर्षे जुने आहे. याठिकाणी बाळगणेशाचे मनमोहक मूर्ती स्वरूप आहे. ही मूर्ती सुमारे 11 फूट उंच असून एकाच दगडात ती कोरली गेली आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीच्या माथ्यावर आहे आणि इथून नागपूर व सभोवतालच्या परिसराचे आकर्षक दर्शन घडते.

मंदिरात पोहोचताना तेथील प्रसन्न दृश्यांचा आणि वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सुमारे 150 मीटर पायी चालून जाऊ शकता किंवा तुम्ही सुमारे 60 पायऱ्या चढून तिथे पोहचू शकता. याच परिसरात असलेल्या अन्य मंदिरांना देखील तुम्ही भेट देऊ शकता. शांत वातावरणामुळे हे सहलीसाठी उचित ठिकाण मानले जाते. या टेकडीवर तुम्ही डबे आणि बसायला चटई सोबत घेऊन छोट्या कौटुंबिक सहलीचा आनंद घेऊ शकता. गणेश चतुर्थीच्या वेळी मंदिरात मोठा उत्सव असतो, भेट द्यायची झाल्यास याच कालावधीत जाण्याचे नियोजन करा.


सकाळी 6 ते रात्री 9


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 6 ते रात्री 9

उपक्रम

अडासा गणपती देवस्थानी या गोष्टी आवर्जून करा

  • अडासा गणपती मंदिरात दर्शन व प्रार्थना
  • मंदिरातून सूर्यास्ताचे नयन मनोहर दृश्य बघणे
  • जवळपासच्या इतर मंदिरांना भेट

लगतची प्रेक्षणीय स्थळे