अजिंठा लेणी

औरंगाबाद

सविस्तर

औरंगाबाद पासून सुमारे 100 किमी अंतरावर वसलेल्या ऐतिहासिक अजिंठा लेणी या महाराष्ट्राची जगभरातील ओळख आहेत. या लेणी अंदाजे इ.स.पूर्व दुसऱ्या शतक काळातील असून शीळांतून कोरलेल्या 30 बौद्ध लेणी स्मारकांचा एक गट असे यांचे स्वरूप आहे. याच लेण्यांजवळ अनेक प्राचीन देवळे आणि मठ सुद्धा पाहायला मिळतात. भारतातील शिल्पकला आणि बौद्ध संस्कृतीचा महत्त्वपूर्ण इतिहास सांगणाऱ्या या लेणी जगविख्यात आहेत. म्हणूनच 1983 मध्ये ह्या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले.  

असं म्हणतात की बौद्ध धर्माचे बरेच अनुयायी आपली आध्यात्मिक उर्जा कायम ठेवण्यासाठी तर कलाकार ह्या लेण्यांमधील कलात्मक प्रेरणा मिळवण्यासाठी या लेण्यांना आवर्जून भेट देतात. पहिल्या लेण्यातील चित्रांमध्ये भगवान बुद्धांचे जीवन दर्शविले गेले आहे, तर दुसऱ्या लेण्यामध्ये देवतांची आणि प्रजनन देवी हरीतीची चित्रे आहेत. 16 आणि 17 क्रमांकाच्या लेणी त्यांच्या स्थापत्य कौशल्याबद्दल भारताची तत्कालीन प्रगती मांडतात. आपण याठिकाणी भेट दिल्यास ही लेणी आवर्जून बारकाईने पहा.


सकाळी ९. ०० - संध्याकाळी ५. ०० सोमवारी बंद


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी ९. ०० - संध्याकाळी ५. ०० सोमवारी बंद

उपक्रम

सांस्कृतिक वारसा असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देताना खाली दिलेल्या गोष्टी आवर्जून करून पहा.

  • गुहेच्या भिंतीवर असलेल्या जातक कथांचा चित्र अभ्यास
  • बौद्ध पेंटिंग्ज आणि गिलाव्यावरील चित्रांचे निरीक्षण
  • ऐतिहासिक घटनांवर आधारित शिल्प व भित्तीलेखांचे निरीक्षण
  • अजिंठा आणि वेरूळ संगीत महोत्सवात सहभाग घेऊ शकता

अजिंठा लेण्यांजवळील प्रेक्षणीय स्थळे