भीमाशंकर ज्योतिर्लिंग

भीमाशंकर

सविस्तर

भीमाशंकर हे मंदिर अगदी घनदाट जंगलात वसलेले 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान असून पुणे शहरापासून ते सुमारे 125 किमी वर आहे. या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर एकूणच या ठिकाणची लोकप्रियता वाढली आहे. हे एक आरक्षित वनक्षेत्र आहे. नगारा शैलीतील ही रचना वास्तूसौंदर्याचा एक अप्रतिम नमुना आहे. प्राचीन विश्वकर्मा शिल्पकारांनी हे काम केले आहे. 

या मंदिराबाबत अनेक दंतकथा आहेत. त्यापैकी एका कथेनुसार हे मंदिर स्वयंभू लिंगाभोवती बांधले गेले होते. लिंग मंदिराच्या गाभाऱ्यात अगदी मध्यभागी आहे. भीमाशंकरची सहल म्हणजे एक प्रकारची पर्वणी ठरते. कारण सह्याद्रीच्या घाटांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते तसेच वन्यजीवन पाहण्याचा साहसी अनुभवही मिळतो. हे शहर भक्तांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक अमूल्य अशी भेट आहे.


सकाळी 4.30 ते रात्री 7.30


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 4.30 ते रात्री 7.30

उपक्रम

भीमाशंकर भेटीत या गोष्टी चुकवू नका

  • भीमाशंकर मंदिरात दर्शन आणि प्रार्थना
  • रोजच्या पूजेमध्ये सहभाग
  • कमलाज्जा मंदिरात प्रार्थना
  • भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य पहा

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे