दीक्षाभूमी

Nagpur

सविस्तर

नागपूरच्या मध्यभागी वसलेली, दीक्षाभूमी म्हणजे आशियातील सर्वात मोठे स्तूप आहे. 2001 मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले. मध्य प्रदेशातील सांची येथील प्रसिद्ध स्तूपाची ही प्रतिकृती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये येथे बौद्ध धर्म स्वीकारला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामूहिक धर्मांतर दिन साजरा करण्यासाठी येथे खूप मोठा सोहळा आयोजित केला गेला होता तेव्हा एकाच वेळी सहा लाखाहून अधिक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमीच्या मध्यभागी तुम्ही अस्थिकलश पाहू शकता तिथे बाबासाहेबांच्या अस्थींचे जतन करण्यात आले आहे. 

तुम्ही दीक्षाभूमीच्या पूर्वेकडील बोधी वृक्षास देखील भेट देऊ शकता. श्रीलंकेवरून या बोधी वृक्षाच्या फांद्या आणून त्याचे रोपण करण्यात आले होते. भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली साक्षात्कार झाला त्या वृक्षाचे हे रोपटे आहे. बोधी वृक्षानंतर आपण भिक्खू निवासाला भेट देऊ शकता, तिथे थाई मठाने स्थापन केलेला भगवान बुद्धांचा भव्य पुतळा आहे. दीक्षाभूमीची वास्तू तसेच ऐतिहासिक सौंदर्य दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करते.


24 तास खुले


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

24 तास खुले

उपक्रम

दीक्षाभूमी येथे आवर्जून करा या गोष्टी

  • बोधी वृक्षास भेट
  • भिक्खू निवासाला भेट
  • धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास हजेरी
  • अस्थिकलश पहाणे

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे