एलिफंटा लेणी

घारापुरी

सविस्तर

गेट वे ऑफ इंडियापासून काही किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे लेण्यांचे बेट दिसेल. इथे तुम्हाला दुसऱ्या शतकातील भारतीय वास्तुकलेचे प्रभावी दर्शन होईल. इथे अनेक पुरातत्व अवशेष पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यापूर्वी अनेक शतके नैसर्गिक कारणांमुळे लेण्यांचे नुकसान झाले असले तरी 1970 च्या दशकात त्या पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न झाला आणि मग पुढे याची दखल घेत 1986 मध्ये युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.

गेट वे ऑफ इंडियाकडून बेटावर जाण्यासाठी निसर्गरम्य फेरीचा आनंद घेता येतो. प्रवेश करताच दृष्टीस पडणारी प्रथम लेणी म्हणजे सदाशिवाचा 7 फूट पुतळा व त्यालगतच प्रवेशद्वारावर असणाऱ्या त्रिमूर्ती या कलाकृती वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. या संपूर्ण लेणी पाहण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे दिवसा लवकर भेट द्या म्हणजे तुम्हाला इथे आरामात वेळ घालवता येईल. 


सकाळी 5.30 - रात्री 11


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 5.30 - रात्री 11

उपक्रम

एलिफंटा लेण्यांना भेट देताना खालील गोष्टी करण्याची संधी दवडू नका:

  • लेणी क्रमांक 1 मध्ये सदाशिव पुतळा आवर्जून पहा
  • स्तूप टेकडी चढण
  • कॅनॉन हिल ट्रेक
  • जवळपासच्या मंदिरांना भेट
  • टॉय ट्रेनची सफर

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे