गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे

सविस्तर

गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरी शहरापासून 25 कि.मी. अंतरावर स्थित असून मंदिराला लागूनच असणारा गणपतीपुळे समुद्रकिनारा हा येथील मुख्य आकर्षण आहे. या मंदिरामध्ये 400 वर्षे जुनी गणेशाची मूर्ती आहे. इतिहासात ही मूर्ती तयार केल्याचा कुठलाच पुरावा नाही त्यामुळे ती स्वयंभू असल्याचे मानले जाते, गणेशमूर्ती धरणीतून उगम पावली अशी आख्यायिका याठिकाणी प्रसिद्ध आहे. मूर्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. सुंदर समुद्रकिनारे आणि टेकड्यांच्या नैसर्गिक सौंदर्याने वेढलेल्या या मंदिराची पूर्ण वास्तू पाहण्यासाठी आपण 1 किमीच्या प्रदक्षिणा मार्गाला फेरी मारू शकता.

तुम्ही मंदिराला लागूनच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत आपली संध्याकाळ घालवू शकता. या मंदिरात कितीही गर्दी असली तरी देवदर्शनावेळी आपल्याला हवी ती शांती नक्की मिळेल. सकाळच्या वेळी तुम्ही निसर्गसौंदर्याने भारावून जाल तर संध्याकाळी आरतीच्या वेळी गाभाऱ्यात लावलेल्या दिव्यांमुळे डोळ्यांचे पारणे फिटेल . मंदिराच्या शेजारी पर्यटकांसाठी उपलब्ध असणारे विविध समुद्री साहसी खेळ खेळल्याशिवाय सहल पूर्ण होत नाही. अध्यात्म, इतिहास आणि धम्माल - हे सारे केवळ गणपतीपुळे मंदिर भेटीत आपण अनुभवू शकता.


सकाळी 5 रात्री 9


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 5 रात्री 9

उपक्रम

गणपतीपुळे मंदिर सहलीत नक्की घ्या हे अनुभव

  • सकाळी किंवा संध्याकाळची आरती
  • श्री गणेशाचे दर्शन
  • मंदिरापासून टेकडीपर्यंत प्रदक्षिणा
  • जेट स्कीइंग आणि स्पीड बोटिंग
  • जवळच्या समुद्र किनाऱ्यांना भटकंती
  • जयगड लाईट हाऊस भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे