हरिहरेश्वर मंदिर

हरिहरेश्वर

सविस्तर

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आजूबाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा असलेले कोकण पट्ट्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हरिहेश्वर मंदिर वसले आहे. हे मंदिर मध्ययुगीन काळात बांधले गेले होते, मुख्य मंदिराच्या आधी छोटे काळभैरव मंदिर आहे. शिव, पार्वती, विष्णू आणि ब्रह्मदेवता ह्या देवतांच्या मूर्तींची पूजा इथे होते . ह्या मंदिराला ‘देवाचे घर’ किंवा ‘देवघर’ असेही म्हटले जाते. ह्यामध्ये चंद्रराव मोरे यांनी बांधलेल्या प्रदक्षिणा मार्गाचा समावेश आहे. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हरीहरेश्वर मंदिराला अनेकदा भेट दिली. दुर्दैवाने हे मंदिर आगीच्या भक्षस्थानी पडले होते परंतु नंतर 1723 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्याचे नूतनीकरण केले.

सांस्कृतिक वारसा असलेले हे मंदिर देशभरातील पर्यटकांसाठी एक नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी तीन समुद्रकिनारे आहेत तसेच याच परिसरामध्ये चार डोंगररांगा जोडलेल्या आहेत. दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर समुद्रकिनारे जवळ असलेले, रायगडच्या किनारपट्टीवर स्थित हे मंदिर तुम्हाला विलक्षण अनुभव देईल हे निश्चित! हर्षिनाचल, हरिहर, पुष्पाद्री आणि ब्रह्माद्रीच्या टेकड्यांनी सुद्धा हा परिसर वेढलेला आहे. कुटुंब किंवा मित्रांसह छोटी सहल वा दीर्घ मुक्काम करण्यासाठी सुद्धा हे ठिकाण अगदी सुयोग्य आहे. याठिकाणचा रम्य निसर्ग डोळ्यात साठवताना आणि शब्दात मांडताना वेळ पुरणार नाही एवढं नक्की!


सकाळी 6 ते संध्याकाळी 8


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 6 ते संध्याकाळी 8

उपक्रम

हरिहरेश्वर मंदिर लगतच्या परिसरातील लक्षणीय उपक्रम

  • हरिहरेश्वर मंदिर दर्शन
  • जवळच्या टेकड्यांवर ट्रेक
  • जवळच्या समुद्रकिनाऱ्यांची भटकंती

लगतची प्रेक्षणीय स्थळे