इस्कॉन मंदिर (खारघर)

नवी मुंबई

सविस्तर

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियन्स (इस्कॉन) ची स्थापना भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1966 मध्ये केली होती. तेव्हापासून, इस्कॉन ही संस्था जगभरातील हरे कृष्णा चळवळ म्हणून विकसित झाली आहे. इस्कॉन खारघर मंदिराची मूळ रचना पांढऱ्या रंगाची आहे आणि नवी मुंबईतील हे पहिले इस्कॉन मंदिर आहे. 8 एकरांवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. सह्याद्रीच्या पर्वतांनी वेढलेल्या या विस्तीर्ण मंदिराचे बांधकाम 2012 मध्ये सुरू झाले. खारघर मंदिराच्या परिसरात भक्तिवेदांत सभागृह आहे. धार्मिक स्थळ असूनही, त्याच्या आवारात एक खास सांस्कृतिक व वैदिक शैक्षणिक केंद्र आहे. येथे गेस्ट हाऊस आणि वाचनालय सुद्धा आहे.

इस्कॉन मंदिर हे खारघर नवी मुंबई विमानतळापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्या मनाला त्वरित शांत करणारा हा परिसर आहे. सर्व इस्कॉन केंद्रे उत्कृष्ट आदरातिथ्य आणि केटरिंगसाठी प्रसिध्द आहेत आणि खारघर केंद्रही त्यात अपवाद नाही. तुम्ही गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करण्याची योजना आखू शकता. वेद आणि भगवान श्रीकृष्णाबद्दल अधिक जाणून घेत असताना विविध पूजांमध्ये सहभागी होऊ शकता.


सकाळी 4.30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4.30 ते रात्री 9.30


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 4.30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4.30 ते रात्री 9.30

उपक्रम

  • इस्कॉन मंदिरात प्रार्थना करून दर्शन
  • श्री राधा मदन मोहनजी मंदिरात प्रार्थना
  • मंदिरातील इतर मंदिरात प्रार्थना आणि दर्शन
  • वैदिक वर्गात सहभाग

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे