लोणार सरोवर

बुलढाणा जिल्हा

सविस्तर

महाराष्ट्रात सांस्कृतिक वारसा जपणारी विविध स्थळे आहेत पण खगोलशास्त्रीय चमत्काराने निर्माण झालेले एकमेवाद्वितीय स्थळ म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील अमरावती येथे असलेले लोणार सरोवर. उल्कापातामुळे 1.8 किलोमीटर जाडीची कड असेलेले हे सरोवर अंदाजे 50,000 वर्षांपूर्वी तयार झाले. अंशतः अल्कधर्मी आणि अंशतः खारट पाण्याच्या या तलावासंदर्भात पौराणिक कथा सुद्धा आहे - लोणासुर नावाच्या राक्षसाला भगवान विष्णूने ठार केले तेव्हा तलावाची निर्मिती झाली असे स्थानिकांचे मत आहे.

या ठिकाणाचे रहस्यमय मूळ आणि धार्मिक संदर्भ यामुळे हे पर्यटनस्थळ एक लक्षणीय आकर्षण झाले आहे. जवळपासची मंदिरे सुद्धा एक हजार वर्षांहून अधिक जुनी आहेत. येथे स्थलांतरित पक्षी आढळत असल्याने वन्यजीव छायाचित्रकारांसाठी हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे.

वैज्ञानिकांनी लोणारला जैवविविधतेचा खजिना म्हटले आहे. हे जगातील फक्त चार बेसाल्टिक रॉक विवरांपैकी एक आहे आणि यास राष्ट्रीय भौगोलिक-वारसा स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.


24 तास उघडे असते


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

24 तास उघडे असते

उपक्रम

लोणार सरोवराची भेट परिपूर्ण करण्यासाठी खालील उपक्रम आवर्जून करा.

  • लोणार ट्रेक
  • पक्षी आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे छायाचित्रण
  • जवळपासच्या मंदिरांचे दर्शन

लगतची प्रेक्षणीय स्थळे