नटराज मंदिर

सातारा

सविस्तर

महादेवाचे तांडव स्वरूप म्हणजेच नटराज यांचे प्रसिद्ध मंदिर सातारा येथे स्थित आहे, उत्तरा चिदंबरम मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, या मंदिराची पायाभरणी 1981 मध्ये झाली. पूज्यश्री श्री चंद्रशेकरेंद्र सरस्वती महास्वामीजी व्यास पूजेला उपस्थित राहण्यासाठी सातारा येथे गेले आणि त्यांनी नटराज मंदिराची इच्छा व्यक्त केली. त्यांचा मान ठेवत सातारकर असलेले आणि स्वामीजींचे भक्त सामन्ना यांनी स्वतःचा एक भूखंड हा मंदिर बांधण्यासाठी भेट म्हणून दिला. तीन वर्षात हे मंदिर बांधून झाले. सातारा येथील नटराज मंदिर हे तामिळनाडू येथील चिदंबरम मंदिराची एक छोटी प्रतिकृती आहे. या मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर सुंदर गोपुरम आहेत.

दक्षिण भारतीय शैलीतील वास्तुकला आणि बारीक कोरीव काम केलेल्या मूर्ती, नटराज भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मुख्य मंदिराबरोबरच इतरही मंदिरे आवारात आहेत व ही मंदिरे एकाच वास्तुशैलीमध्ये आहेत.


सकाळी 7 - दुपारी 12 आणि संध्याकाळी 3 - 8


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 7 - दुपारी 12 आणि संध्याकाळी 3 - 8

उपक्रम

नटराज मंदिर दर्शनात काय पाहावे?

  • श्री नटराजांचे दर्शन
  • मंदिरांची बांधणी
  • गणपती मंदिर, हनुमान मंदिर आणि इतर मंदिरे
  • राधा-कृष्ण, भगवान शिव आणि नवग्रह (नऊ ग्रह)

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे