प्रतापगड किल्ला

पुणे

सविस्तर

महाराष्ट्राच्या इतिहासाचा जिताजागता साक्षीदार म्हणजे किल्ले प्रतापगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार आदिलशाही विरुद्धच्या युद्धाच्या वेळी नीरा व कोयना ह्या नद्यांचे किनारे आणि सभोवतालचा भूभाग ह्यांच्या रक्षणासाठी या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. तीन वर्षांनंतर, प्रतापगडची प्रसिद्ध लढाई याच किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली घडली. अफझलखानाचा वध ही प्रतापगडावरील ऐतिहासिक घटना मानली जाते. मराठा साम्राज्याची ही एक प्रकारे नांदीच म्हणता येईल. 1957 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ह्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 17 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.

प्रतापगड ह्या शब्दाचा अर्थच शौर्यवान किल्ला आहे. जर तुम्ही महाबळेश्वरमध्ये असाल तर लागलीच किल्ल्याला भेट देऊन हा इतिहासाचा साक्षीदार जवळून पाहू शकता. भवानी माता मंदिर आणि श्री शंकर महादेव (शिव) मंदिर या दोन्ही मंदिरांना भेट देण्यास मात्र अजिबात विसरू नका. अनेक गिर्यारोहक व तरुण या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. तुम्ही स्थानिक, शिवभक्त, इतिहास प्रेमी किंवा परदेशी पर्यटक यापैकी कोणीही असलात तरीही प्रतापगड किल्ल्याची भेट तुम्हाला थक्क करेल आणि तुम्हाला महाराष्ट्राचा सार्थ इतिहास पाहून नक्कीच अभिमान वाटेल. 


सकाळी 10 - संध्याकाळी 6 पर्यंत


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 10 - संध्याकाळी 6 पर्यंत

उपक्रम

प्रतापगडावर आवर्जून पाहण्याची ठिकाणे:

  • बालेकिल्ल्याला भेट
  • महादेवाच्या मंदिराचे दर्शन
  • खालचा किल्ला
  • भवानी मंदिरात दर्शन
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे