रामटेक

नागपूर

सविस्तर

मुख्य नागपूर शहराच्या गर्दीतून काहीसे दूर, ऐतिहासिक आणि वास्तूशास्त्रानुसार महत्वपूर्ण वारसा लाभलेल्या रामटेकच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे, तलाव, किल्ले आणि अभयारण्ये अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील सर्वाधिक लोकप्रिय आकर्षण म्हणजे 600 वर्ष जुने राम मंदिर. हे मंदिर राम धाम म्हणून प्रसिद्ध आहे. रामगिरी टेकडीच्या शिखरावर असलेल्या या भव्य मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. महान कवी कालिदास यांनी येथे आपले महाकव्य मेघदूत लिहिले असे मानले जाते. लोककथांनुसार, श्री प्रभू रामचंद्र, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणसुद्धा वनवासात असताना येथेच थांबले होते. वन्यजीवप्रेमींनी येथे असलेल्या व्याघ्र अभयारण्यास नक्की भेट द्यावी.

निर्मल खिंडसी तलाव आणि येथील निसर्गसौंदर्य रामटेकच्या एकूण सौंदर्यात भर घालते. जर तुम्हाला भारताचा ऐतिहासिक वारसा जाणून घ्यायचा असेल आणि अचंबित करणारी वास्तुकला बघायची असेल व जर तुम्ही नागपूर मध्ये आहात तर रामटेकला जरूर भेट द्या.


सकाळी 6 रात्री 9


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 6 रात्री 9

उपक्रम

रामटेक भेटीत आवर्जून पूर्ण करा हे उपक्रम

  • प्राचीन मंदिर पहा
  • निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घ्या
  • खिंडसी तलावाची पिकनिक

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे