रतनगड किल्ला

रतनवाडी गाव

सविस्तर

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील रतनगड किल्ला 400 वर्षे जुना आहे. रतनगडावर पोकळी असलेला टोकदार सुईच्या डोळ्यासारख्या दिसणारा खडक आहे.या खडकामुळे हा गड सहजपणे ओळखला जातो. या खडकास सुईचा डोळा असे देखील म्हणतात. किल्ल्याला गणेश, हनुमान, त्र्यंबक आणि कोकण असे 4 दरवाजे आहेत. त्यांची प्राचीन वास्तुकलेची भव्यता बघून पर्यटक चकित होतात. निरीक्षण व अभ्यासासाठी ही एक अत्यंत विलक्षण रचना आहे.

रतनगड किल्ल्याच्या सीमेवरुन जाताना एकामागून एक महाकाय कडे पाहून तुम्ही थक्क व्हाल. हा ऐतिहासिक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून जिंकला होता. हा किल्ला महाराजांचा खूप आवडता किल्ला मानला जातो. काहीतरी भन्नाट करावं अशी आपली इच्छा असेल तर या गडाची भ्रमंती तुम्हाला एक परिपूर्ण अनुभव देईल. किल्ल्याच्या टोकावरून दिसणारी हिरवळ व भंडारदरा धरणाची दृश्ये बघताना त्या निसर्ग सौंदर्याने कोणीही भारावून जाईल.


24 तास सुरु असते


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

24 तास सुरु असते

उपक्रम

रतनगड भ्रमंतीदरम्यान नक्की करा या गोष्टी

  • किल्ल्याचा ट्रेक
  • चारही दरवाजांचे निरीक्षण
  • प्रसिद्ध सुईचा डोळा पाहणे
  • किल्ल्याच्या माथ्यावरील दृश्यांचा आनंद घ्या

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे