सेवाग्राम

सेवाग्राम

सविस्तर

वर्ध्याच्या बाहेरील एक छोट्या गावात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा प्रसिद्ध आश्रम सेवाग्राम आहे. गांधीजींनी 1936 मध्ये येथे आपले निवासस्थान स्थापित केले आणि आपल्या पत्नी कस्तुरबा यांच्यासह इथे ते वास्तव्य करत होते. नंतर, कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे, त्यांना त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांना इथे बोलवावे लागले आणि लवकरच सेवाग्राम ही एक पूर्ण विकसित संस्था बनली. आश्रमात बांधलेल्या झोपड्या गावातील इतर घरांप्रमाणेच आहेत. तिथे "आदी निवास" ही आदिवासींनी बांधलेली पहिली झोपडी आहे जिथे सुरुवातीला गांधीजी रहात असत. आश्रमात आदी निवास अजूनही उठून दिसते.

सेवाग्राम मधील गांधीजींची झोपडी म्हणजेच बापू कुटी व कस्तुरबाजींची झोपडी - तिला "बा-कुटी" सुद्धा विशेष पाहण्यासारखी आहे. "आखरी निवास" इथे गांधीजी नोआखलीला जाण्यापूर्वी राहिले होते. स्वयंपाकघर, अतिथी कक्ष आणि गांधीजींच्या जवळच्या मित्रांचे निवासस्थान देखील बघण्यासारखे आहे. गांधीजींच्या जीवनाबद्दल अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी तुम्ही गांधीजींच्या फोटोच्या प्रदर्शनाला भेट देऊ शकता. हे प्रदर्शन गांधीजींचे जीवन आणि त्यांचे कार्य दर्शवते.


24 तास सुरु


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

24 तास सुरु

उपक्रम

सेवाग्राम भेटीतील मुख्य आकर्षण

  • गांधीजींचे जीवनकार्य मांडणारे फोटो प्रदर्शन
  • बापू कुटी
  • आदि निवास
  • बा कुटी
  • आखरी निवास
  • बापूंचे स्वयंपाकघर
  • पुस्तकालय

लगतची प्रेक्षणीय स्थळे