श्री साईबाबा देवस्थान, शिर्डी

शिर्डी

श्री साईबाबा देवस्थान, शिर्डी

शिर्डी

सविस्तर

शिर्डी हे छोटंसं शहर जगभरातील साईभक्तांसाठी एक लोकप्रिय श्रद्धास्थान आहे. श्री साईबाबा यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे हे शहर महाराष्ट्रातील सर्वाधिक भेट दिले जाणारे तीर्थक्षेत्र आहे. 1917-18 मध्ये स्थापना झालेले श्री साईबाबा मंदिर हे शिर्डीचे मुख्य आकर्षण आहे. याच ठिकाणी बाबांनी समाधी घेतली. भाविक मंदिराला भेट देताना समाधी स्थळ देखील पाहू शकतात.

साईबाबांच्या जीवनाची झलक सांगणारा एक विशेष चित्र आणि कलाकृती संग्रह मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पहायला मिळतो. मंदिरात दर्शन घेतल्यावर तुम्ही गुरुस्थानालाही भेट देऊ शकता - साईबाबा शिर्डीला आले तेव्हा त्यांनी आपला बराचसा वेळ इथे घालवला होता. साईबाबांच्या सुंदर आठवणींचे हे शहर म्हणजे भाविक आणि इतिहास रसिकांसाठी आकर्षणाचा विषय आहे.


सकाळी 5.30 - रात्री 11


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 5.30 - रात्री 11

उपक्रम

शिर्डीला भेट देताना खालील गोष्टी करण्याची संधी दवडू नका:

  • प्रसादालयात जेवणाचा आस्वाद घ्या
  • काकड आरतीला (सकाळची आरती) उपस्थिती
  • धूप आरतीला (सायंकाळची आरती) उपस्थिती
  • शेज आरतीमध्ये सहभाग (रात्रीची आरती)
  • पालखी मिरवणुकीत सहभाग (गुरुवारी)

लगतची प्रेक्षणीय स्थळे