शिवनेरी किल्ला

कुसूर, जुन्नर

सविस्तर

मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जन्मस्थान पुण्यापासून 90 किमीवर असलेल्या जुन्नर शहरात वसलेले असून या किल्ल्याची रचनात्मक शैली अभ्यासण्यासारखी आहे. या त्रिकोणीय किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वारासह वेगळे 'साखळी प्रवेशद्वार' आहे. किल्ल्याची वास्तुकला आणि याठिकाणची पाण्याची सोय इ.स पहिल्या शतकापासून याठिकाणी मानवी वस्ती असल्याचे दाखले देते.  

शिवनेरीवर शिवाई मंदिर आहे. शिवाई मातेच्या गडावर जन्म झाला म्हणून राजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. या स्मारकास भेट दिल्यावर तुम्हाला इतिहासातील तेच क्षण अनुभवल्याची प्रचिती होईल. येथील कडेलोट पॉईंट देखील प्रसिद्ध आहे, येथून फाशीची शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांना बेड्या घालून वरून खाली फेकण्यात येत असे. तुम्ही पुण्यात असल्यास किंवा जवळपासच्या ठिकाणी सुट्टीची योजना आखत असल्यास इतिहास आणि रचनात्मक सौंदर्य लाभलेल्या या किल्ल्यास नक्की भेट द्या.


सकाळी 6 - संध्याकाळी 8


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 6 - संध्याकाळी 8

उपक्रम

शिवनेरीवरील पाहण्यासारखी ठिकाणे

  • बदामी तलाव
  • राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक
  • शिवाई देवी मंदिर
  • कडेलोट पॉईंट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे