सिंहगड किल्ला

थोपटेवाडी

सविस्तर

कौंडिण्य ऋषींच्या नावावरून हा सिंहगड गड ‘कोंढाणा’ म्हणून ओळखला जातो. सिंहगड किल्ल्याला एक गौरवशाली आणि समृद्ध इतिहास आहे. सह्याद्री पर्वतरांगातील भुलेश्वर कड्यावर एका उंच टेकडीवर स्थित हा किल्ला जमिनीपासून 760 मीटर उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला युद्ध नीती लक्षात घेऊन बांधलेला आहे. शिवाजी महाराजांचा मावळा सेनापती तानाजी मालुसरे यांनी 1670 मध्ये सिंहगडावर सर्वात उल्लेखनीय कामगिरी केली. ह्या लढाईसह हा किल्ला अनेक युद्धांचे ठिकाण होते.

पुणे दरवाजा किंवा कल्याण दरवाजा या दोन प्रवेशद्वारांमधून तुम्ही किल्ल्यात प्रवेश करू शकता. तानाजी मालुसरेंच्या स्मारकाची भेट आणि गडावरील कौंडिण्य ऋषी मंदिराच्या भिंतींवरील कोरीव काम न पाहिल्यास सिंहगडाची भेट अपूर्ण ठरेल. महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याची एक महत्वपूर्ण भूमिका आहे तसेच त्याला एक देदीप्यमान इतिहास लाभला आहे.


सकाळी 5 ते संध्याकाळी 6


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 5 ते संध्याकाळी 6

उपक्रम

कोंढाणा गड भ्रमंती मध्ये आवर्जून पहा या गोष्टी

  • कौंडिण्य ऋषी मंदिर
  • राजाराम महाराजांची समाधी
  • तानाजी स्मारक आणि समाधी
  • हवा पॉइंट
  • टिळक बंगला
  • काली मंदिर

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे