स्वामीनारायण मंदिर

नागपूर

सविस्तर

नागपूर येथील स्वामीनारायण मंदिर म्हणजे जगभरात स्वामीनारायण संस्थेने स्थापित केलेल्या हजारापेक्षा जास्त मंदिरांपैकी सर्वात मोठे मंदिर आहे. अक्षरधाम मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करते. मंदिराची रचना सोमपुरी शैलीत सुंदररित्या केली गेलेली आहे. इथे एक यात्री निवास, साधू सदन आणि फूड कोर्ट देखील आहे. मंदिराच्या परिसरात पार्किंग, एक मोठे स्वयंपाकघर, एक उपहार गृह आणि मुलांसाठी खेळण्याची जागा यासारख्या सुविधा आहेत. 

हे दोन मजली मंदीर सायंकाळी दिवेलागणी नंतर वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशात न्हाऊन निघते, हा क्षण नेत्रसुखद असतो. मंदिरात दर्शन घेताना ह्या मंदिराची रचना भाविकांना मंत्रमुग्ध करते. मंदिराच्या रचनेवरील सुंदर कोरीव काम पाहण्यासाठी संपूर्ण मंदिरात एक फेरी आवर्जून मारा. केवळ या मंदिराच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर तिथे मिळणारी शांतता अनुभवण्यासाठी भाविकांनी ह्या मंदिराला नक्कीच अवश्य भेट द्यावी.


सकाळी 8 - दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 - 8.30


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 8 - दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 - 8.30

उपक्रम

स्वामीनारायण मंदिरातील विशेष उपक्रम:

  • मंगळा आरतीत सहभाग (सकाळी 6)
  • शेंगर आरतीत सहभाग (सकाळी 7.30 वाजता)
  • राजभोग आरतीत सहभाग (सकाळी 11.15)
  • संध्या आरतीत सहभाग (सायंकाळी :7)
  • शयन आरतीत सहभाग (संध्याकाळी 8.30 वाजता)
  • सत्संगाचा आनंद घ्या
  • भोजनालयात जेवण

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे