त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

श्रीमंत पेशवे पथ, त्र्यंबक

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

श्रीमंत पेशवे पथ, त्र्यंबक

सविस्तर

नाशिकपासून 28 कि.मी. अंतरावर , ब्रह्मागिरी टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबक या गोदावरी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर हे श्री शंकराचे प्राचीन मंदिर आहे. नानासाहेब पेशवे यांनी 17 व्या शतकात बांधलेले हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात आहे. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने पापक्षालन व मोक्ष प्राप्तीसाठी या मंदिराचे दर्शन घेतले जाते असे मानतात. 

हे मंदिर कलात्मक सौंदर्य आणि रचनेमुळे प्रसिद्ध आहे. ह्या पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची अनोखी संरचना, कोरीव काम आणि ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे प्रतीक असणाऱ्या तीन लिंगांमध्ये या मंदिराचे सौंदर्य सामावले आहे. ही लिंग हीरे, पाचू आणि इतर मौल्यवान खड्यांनी सजवलेले आहेत. विविध पौराणिक कथांमुळे हे मंदिर सर्वात लोकप्रिय असे श्री शंकरांचा आशीर्वाद लाभलेले हे क्षेत्र आहे.


सकाळी 5.30 ते रात्री 9


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 5.30 ते रात्री 9

उपक्रम

त्र्यंबकेश्वर येथे भेट देताना या गोष्टी करायला विसरू नका

  • मंगल आरतीला उपस्थिती
  • रुद्राभिषेक पूजा
  • मृत्युंजय मंत्र पूजा

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे