वेळणेश्वर मंदिर

वेळणेश्वर

सविस्तर

वेळणेश्वर या छोट्या गावात हे 500 वर्षाहून प्राचीन वेळणेश्वर मंदीर आहे, वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ असणाऱ्या या मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास केली जाते ज्या प्रकाशात मंदिराची वस्तू विलोभनीय दिसते. या शंकर मंदिराचा पाया गाडगीळ कुटुंबाने रचल्याचे म्हंटले जाते. श्री त्र्यंबक रावजी गोखले यांनी पुढे त्याचे नूतनीकरण केले आणि कोकणात हे मंदिर म्हणजे एक लोकप्रिय आकर्षण ठरले. या पवित्र वास्तूभोवती असलेली शांतता ही भारताच्या विविध भागातील पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराच्या समुद्रकिनाऱ्यावर एमटीडीसी रिसॉर्ट मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. 

या मंदिराचे आकर्षण म्हणजे या वास्तूचे मंत्रमुग्ध करणारे रंगकाम आणि प्रशस्त व स्वच्छ आवार. इथे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. प्रदक्षिणा मार्गात आजूबाजूला, देवळाच्या इतिहासाची माहिती दिलेली आहे. मंदिराच्या बाहेर दुकानांमध्ये उपलब्ध असलेला प्रसाद आपल्या कुटुंब व नातेवाईकांसाठी आवर्जून न्या.


सकाळी 6 - रात्री 8


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 6 - रात्री 8

उपक्रम

वेळणेश्वर मंदिर समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करताना या गोष्टी आवर्जून करा

  • श्री शंकराचे दर्शन आणि प्रार्थना
  • स्टॉलवरील प्रसाद आणि अन्नपदार्थांचा आस्वाद घ्या

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे