विजयदुर्ग किल्ला

विजयदुर्ग

सविस्तर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील हा सर्वात जुना विजयदुर्ग किल्ला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. गिर्ये गावात असल्याने हा किल्ला आधी 'गेरिया' ह्या नावाने ओळखला जात असे. शिलाहार राजवटीच्या राजा भोजच्या कारभारातील हा किल्ला 1193 ते 1205 दरम्यान बांधण्यात आला. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिल शहाकडून हा भव्य किल्ला ताब्यात घेतला व तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव 'विजय' असल्याने किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग असे ठेवले. 

विजयदुर्ग हा किनाऱ्यावरील सर्वात मोठा किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या उत्तम आणि सुबक बांधणीमुळे हा किल्ला 'ईस्टर्न जिब्राल्टर' म्हणून देखील ओळखला जात होता.

किल्ला अगदी मोक्याच्या स्थानी असल्याने अभेद्य होता. किल्ल्याच्या लाल खडक मातीने बनलेल्या भिंती इतिहासाच्या साक्षीदार आहेत. त्यांनी अनेक थोर नेते पहिले आहेत. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये असाल तर हे एक ऐतिहासिक आश्चर्य पाहणे तुम्ही चुकवू नये. विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन महाराष्ट्राचा सागरी वारसा जाणून घेण्याची संधी दवडू नका!


सकाळी 6 - रात्री 9


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 6 - रात्री 9

उपक्रम

विजयदुर्ग भेटीत पाहण्याची मुख्य ठिकाणे

  • मराठा युद्धनौकांच्या नांगरणीचे प्रमुख ठिकाण
  • आपत्कालीन स्थितीत बाहेर पाडण्यासाठी तयार केलेला बोगदा
  • किल्ल्याच्या भिंतींवर आदळलेल्या तोफगोळ्यांच्या खुणा
  • वरचा आणि खालचा किल्ला
  • किल्ल्यावरून अरबी समुद्राचे दृश्य

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे