चिखलदरा

चिखलदरा

सविस्तर

सर्वाधिक उष्णतेची शहरे असणाऱ्या विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे समुद्रसपाटीपासून 1118 मीटरवर वसलेलं चिखलदरा. अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याचा उल्लेख महाभारत ह्या महाकाव्यात आढळतो. पौराणिक कथांनुसार भीमाने कीचकाला ठार मारले आणि खोऱ्यात खाली फेकले, यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. तुम्ही चिखलदरा येथे पाऊल टाकताच हवेतील कॉफीचा गंध तुम्हाला भारावून टाकेल. या प्रदेशातील हे एकमेव कॉफी उत्पादक क्षेत्र आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित चिखलदरा विविध प्राणी आणि वनस्पतींनी समृद्ध आहे. चिखलदरा येथून हाकेच्या अंतरावर असणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे येणाऱ्या पर्यटकांना एक साहसी अविस्मरणीय अनुभव देऊन जातो.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

चिखलदरा भेटीत खालील अनुभव नक्की घ्या

  • भीमकुंड दर्शन
  • मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सफारी
  • प्राचीन ग्वालीगड किल्ल्याची भ्रमंती
  • मुक्तागिरी मंदिरात दर्शन

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे