इगतपुरी

नाशिक

सविस्तर

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे राज्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. खळखळणारे धबधबे, नितळ तलाव आणि समृद्ध जंगले यामुळे इगतपुरी आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ नेते. जुने किल्ले आणि निसर्गरम्य दृश्यांव्यतिरिक्त, रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंग असे साहसी खेळ आपण येथे अनुभवू शकता. 

इगतपुरी येथे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रात शेकडो लोक ध्यानसाधनेसाठी येत असतात. शांततेत आत्मचिंतन किंवा खळाळत्या नदीत राफ्टिंग असे दोन टोकाचे अनुभव एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रत्येक पर्यटकाची हेतुपूर्ती येथे होते हे निश्चित!

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

इगतपुरी भेटीत खालील अनुभव नक्की घ्या

  • घाटण देवी मंदिरात प्रार्थना
  • रॉक क्लाइंबिंग
  • रिव्हर राफ्टिंग
  • भावली धरणाला भेट
  • प्राचीन त्रिंगलवाडी किल्ल्यावर भ्रमंती

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे