पन्हाळा

पन्हाळा

सविस्तर

मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा जपणारा पन्हाळा गड, गडकिल्ल्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. समुद्रसपाटीपासून 3177 फूट उंचीवर, कोल्हापूर पासून 18 किलोमीटर दूर उभा कणखर पन्हाळा गड हा तितकाच शांत थंड हवेचा परिसर आहे. विजापूरच्या आदिलशाही घराण्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळा किल्ला जिंकला होता. इथला दऱ्या-खोऱ्यातील निसर्गरम्य परिसर हा कामाच्या कचाट्यात अडकलेल्या जीवांना क्षणभर विश्रांती घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देतो. 

ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिरे यामुळे पन्हाळा पर्यटक व मुख्यतः तरुण गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहे. जर तुम्ही कोल्हापूरात असाल तर पन्हाळ्याची भेट चुकवू नका.

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

पन्हाळा गडावरील हे उपक्रम चुकवू नका

  • पन्हाळा गडाची संपूर्ण सफर
  • सज्जा कोठी
  • सनसेट पॉईंटवरून सूर्यास्त दर्शन
  • 18व्या शतकात कवी मोरोपंतांनी प्रसिद्ध केलेल्या पाराशर लेण्यांना भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे