तोरणमाळ

नंदुरबार

सविस्तर

सातपुडा पर्वतरांगामध्ये समुद्रसपाटीपासून 3770 फूट उंचीवर वसलेल्या तोरणमाळ गिरिस्थानावर निसर्गाचा वरदहस्त आहे, नाशिकपासून सुमारे 305 किमी आणि सुरतपासून 200 किमी अंतरावर असणारे तोरणमाळ हिरवळीने वेढलेले आहे, येथील तलाव पावसाळयात काठोकाठ भरतात त्यामुळे पावसाळ्याच्या वीक एंड सहलीसाठी हे अगदी योग्य ठिकाण आहे. 

या भागात आढळणाऱ्या तोरणा वनस्पती वरून या टेकडीचे नाव 'तोरणमाळ' असे पडले. इथेच टेकडीवर आदिवासींची देवी 'तोरणा' देवीचे मंदिर असून त्यावरूनच तोरणमाळ असे नाव पडल्याचेही मानले जाते. येथील वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती पाहण्यासाठी, पवित्र मंदिरांमध्ये दर्शनासाठी व ट्रेकिंगसाठी याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

तोरणमाळ गिरिस्थानाची सहल परिपूर्ण करायची असल्यास खालील अनुभव चुकवू नका 

  • कमळ तलावाला भेट
  • प्राचीन मच्छिंद्रनाथ लेण्यांना भेट
  • सिताखाई पॉइंट
  • खडकी पॉईंट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे