वाई

सातारा जिल्हा

सविस्तर

मंदिरांसाठी प्रसिद्ध सातारा जिल्ह्यातील वाई हे छोटेसे शहर आपल्या निसर्गसौंदर्याने अनेक पर्यटकांना भुरळ घालते. कृष्णा नदीवर वसलेले हे पेशवे काळातील प्रमुख शहर होते. दक्षिण काशी या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये श्रीशंकर व गौरीपुत्र विनायकाचे देवस्थान प्रसिद्ध असून त्याच्या दर्शनासाठी दर वर्षी अनेक भाविक गर्दी करतात. या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 हून अधिक मंदिरे आहेत.

साताऱ्यापासून 35 किमी. अंतरावर वसलेले वाई हे, वीक एंड सहलीसाठी उचित निवड ठरते, येथूनच पाचगणी किंवा महाबळेश्वरलासुद्धा तुम्ही जाऊ शकता. निसर्गप्रेम, इतिहासाप्रती कुतूहल वा धार्मिक कोणत्याही कारणांने तुम्ही वाईला भेट देऊ शकता आणि हे शहर तुम्हाला अजिबात निराश करणार नाही याची खात्री बाळगा. येथे असतांना बोटिंग व पारंपारिक महाराष्ट्रीय भोजनाचा आस्वाद घ्यायची संधी दवडू नका.



फोटो गॅलरी

Key Pointers

हवामानाचा अंदाज

उपक्रम

वाई शहर भ्रमंती दरम्यान नक्की करावेत असे उपक्रम:

  • ऐतिहासिक नाना फडणवीस वाडा पाहावा
  • ढोल्या गणपती मंदिरात दर्शन
  • वाईची लेणी पाहावी
  • धोम व बालकवाडी धरण प्रकल्पांना भेट

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे