भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

पुणे

सविस्तर

पुणे शहरापासून 138 किमी अंतरावर स्थित भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य विस्तीर्ण क्षेत्रात पसरले आहे. जैवविविधतेने समृद्ध असे हे अभयारण्य आयबीए (Important Bird and Area) प्रमाणित (पक्ष्यांसाठी राखीव) आहे. या अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. हे जगभरातील जैवविविधतेने समृद्ध 12 ठिकाणांपैकी एक मानले जाते. 

तुम्हाला साहसी खेळांची आवड असल्यास या अभयारण्याच्या शेजारी अनेक ट्रेकिंग पॉईंट आहेत. वन्यजीव फोटोग्राफर्स साठी तर ही एक पर्वणीच आहे. चट्टे असलेला तरस, सोनेरी रंगाचा लांडगा आणि बागडणारी हरीणे आपल्या कॅमेऱ्यात टिपायला आपणास नक्की आवडेल. या अभयारण्यामध्ये देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, भीमाशंकर मंदिर सुद्धा आहे जिथे श्रीशंकरांची स्वयंभू पिंड आहे असे म्हणतात. या अभयारण्याचे वैभव पावसाळ्यात आणखीनच खुलून येते.


ऑक्टोबर - मार्च


कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑक्टोबर - मार्च

विना गर्दीचा हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी भीमाशंकर भेटीत हे उपक्रम आवर्जून करा

  • फायरफ्लाय साइटिंग (काजवे दर्शन)
  • सफारी
  • ट्रेकिंग
  • नौकाविहार
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • पक्षी निरीक्षण

या भागात आढळणारे वन्यजीव