कास पठार आरक्षित वन

सातारा

सविस्तर

घनदाट जंगल आणि दुर्मिळ सुंदर वनस्पती असलेले कास पठार आरक्षित वन हे एकदा तरी पाहण्यासारखे आहे. हे आरक्षित वन साताऱ्यापासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या महाराष्ट्रातील पठारावर फुलांची दरी (फ्लॉवर व्हॅली) आहे. 2012 मध्ये हे वन युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून घोषित केले. रंगीबेरंगी फुले व वनांनी व्यापलेल्या कास पठारावर फुलांच्या एकूण 850 आणि 33 दुर्मिळ प्रजाती आहेत. कास पठाराचे खोरे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फुलून येते. इथून कोयना अभयारण्याचे मनोहर दृश्य सुद्धा दिसते. 

पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान हलका पाऊस असल्याने या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असते. पठाराभोवती शक्यतो चालत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पठाराजवळ संध्याकाळच्या वेळेला कँम्पिंग सुद्धा करू शकता जिथून तुम्हाला काजव्यांचे अत्यंत नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळेल.


ऑगस्ट - ऑक्टोबर


नोव्हेंबर ते जुलैपासून बंद


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑगस्ट - ऑक्टोबर

गर्दी नसलेला हंगाम:

नोव्हेंबर ते जुलैपासून बंद

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी कास पठार भेटीत हे उपक्रम आवर्जून करा

  • नदी ओलांडणे (रिव्हर क्रॉसिंग)
  • ट्रेकिंग
  • नौकाविहार (बोटिंग)
  • व्हॅली-क्रॉसिंग
  • सफारी
  • कॅम्पिंग

कास पठारावर आढळणारे वन्यजीव