कोयना वन्यजीव अभयारण्य

सातारा

सविस्तर

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले कोयना वन्यजीव अभयारण्य हे युनेस्कोचे जागतिक वारसा ठिकाण असून इथे अनेक रोमांचक नैसर्गिक दृश्ये, वारसा स्थळे आणि दुर्मिळ वनस्पती आहेत. हे महाराष्ट्राच्या अनेक व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे आणि इथे भारतीय बायसन (गवा), सांबर हरीण, किंग कोब्रा आणि मोठी खार इत्यादी वन्यजीव आढळतात.

पक्षीप्रेमींसाठी तर ही पर्वणीच म्हणता येईल, येथे तुम्हाला एशियन फेरी ब्लूबर्ड्स आणि रुफस वुडपीकर्स पाहायला मिळतील. याठिकाणचे भव्य जलविद्युत (हायड्रोइलेक्ट्रिक)निर्मिती करणारे कोयना धरण आवर्जून पाहण्यासारखे आहे. 12 व्या शतकात माळव्याचा राजा म्हणजेच राजा भोज यांनी बांधलेला वासोटा किल्ला तुमच्या सहलीत नक्की समाविष्ट करा. जर तुम्ही निसर्ग प्रेमी किंवा इतिहास प्रेमी असाल तर कोयना वन्यजीव अभयारण्य सहल तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल.  


नोव्हेंबर - मार्च



फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

नोव्हेंबर - मार्च

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी कोयना वन्यजीव अभयारण्य भेटीत हे उपक्रम आवर्जून करा

  • जंगल सफारी
  • निसर्गाच्या सानिध्यात भटकंती
  • ट्रेकिंग
  • सायकलिंग
  • मासेमारी

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

कोयना वन्यजीव अभयारण्यात आढळणारे प्राणी