मेळघाट व्याघ्र प्रकल्प

अमरावती

सविस्तर

सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प नागपूरपासून 225 किमी अंतरावर आहे. हा महाराष्ट्रातील पहिला अधिकृत व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. परदेशी प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींसह या प्रकल्पामध्ये दुर्मिळ अशी जंगली घुबडे आहेत. आपण भारतीय रानगवा, बिबट्या, नीलगाय, सांबर हरण, अस्वल आणि वन्य प्राण्यांच्या इतर प्रजाती पाहण्यासाठी जंगल सफारी बुक करू शकता. याठिकाणी रात्रीच्या सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरेल. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वर्षभर आल्हाददायक वातावरण असले तरी हिवाळ्यातील काही महिन्यांमध्ये येथे फारच मोहक दृश्य पाहायला मिळते. 

या ठिकाणी हत्तीवरून सफर, कायकिंग (बोटिंग), झोर्ब बॉलिंग, ट्रेकिंग आणि रिव्हर क्रॉसिंग इत्यादी साहसी खेळ नक्की करून पहा व जर तुम्हाला कला व संस्कृतीत रस असेल तर या ठिकाणी आदिवासींची संस्कृती पाहण्यासाठी तुम्ही आदिवासी नृत्य कार्यक्रम चे बुकिंग करू शकता.


डिसेंबर - मे


कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

डिसेंबर - मे

गर्दी नसलेला हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

मेळघाट व्याघ्र प्रकल्प भेटीदरम्यान हे उपक्रम आवर्जून करा

  • दिवसा सफारी
  • रात्र सफारी
  • नदी ओलांडणे (रिव्हर क्रॉसिंग)
  • हत्तीवरून फेरी
  • कायकिंग (Kayking)
  • संपूर्ण दिवस सफारी
  • ट्रेकिंग
  • आदिवासी नृत्य कार्यक्रम

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळणारे वन्यजीव