नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प

निशाणी

सविस्तर

महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात वसलेला नवेगाव नागझिरा हा राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून भारतात आढळणार्‍या जवळजवळ सर्व प्रमुख वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती इथे आढळतात. या वनस्पतींचे निरीक्षण कारण्यासाठी या भागात हिवाळ्यात भेट देणे उत्तम असते, याच वेळी या प्रकल्पात मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी सुद्धा येतात. 

प्रकल्पाच्या आत अनेक तलाव असून, नवेगाव-नागझिरा हे पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. वाघ, बिबट्या, स्लॉथ, रानडुक्कर, मोठ्या उडणाऱ्या खारी असे बरेच प्राणी तुम्हाला ह्या जंगल सफारी दरम्यान पाहायला मिळतील. या प्रकल्पाच्या आजूबाजूने वसलेल्या अनेक छोट्या गावांना सुद्धा तुम्ही भेट देऊन अस्सल ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेऊ शकता. आदिवासी जीवनाची आणि संस्कृतीची जवळून पाहण्यासाठी कांकेर, नारायणपूर आणि कवर्धा सारख्या स्थळांना नक्की भेट द्या.


ऑक्टोबर - मे


1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑक्टोबर - मे

गर्दी नसलेला हंगाम:

1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद

उपक्रम

नवेगाव नागझिरा भेटीत आवर्जून करण्यासारखे उपक्रम खालीलप्रमाणे:

  • जंगल / जीप सफारी
  • पक्षी निरीक्षण
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पना आढळणारे वन्यजीव