पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प

सिवनी आणि छिंदवाडा

पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प

सिवनी आणि छिंदवाडा

सविस्तर

मध्य प्रदेश व महाराष्ट्र असा दोन राज्यांत पसरलेला पेंच हा एकमेव व्याघ्र प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान आहे. तिथे वाहणाऱ्या नदीवरून या उद्यानाचे नाव पेंच असे ठेवण्यात आले. महाराष्ट्रात चोरबाहुली, खुर्सापार, खुबाडा, सुरेवानी आणि सिलारी या सहा सफारी मार्गांद्वारे तुम्ही या उद्यानाची सफर करू शकता. इथली जैवविविधता इतकी समृद्ध आहे की रुडयार्ड किपलिंग आपले प्रसिद्ध पुस्तक "द जंगल बुक" यासाठी हे प्रेरणास्थान असल्याचे सांगतात. ह्या प्रकल्पामध्ये बंगाल टायगर, मगर, चट्ट्यांचे हरीण आणि नीलगाय यासह अनेक प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. जर तुम्ही पक्षीनिरीक्षक असाल तर आपल्याला ऐकून आनंद होईल की ह्या प्रकल्पामध्ये स्थलांतरीत असे एकूण 225 प्रकारचे पक्षी आहेत ज्यामध्ये हॉक ईगल, हनी बझार्ड, कलरफुल फॉल, किंगफिशर आणि विविध प्रकारचे घुबड यांचा समावेश आहे. पेंचचा अनुभव घेण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे इथे काही दिवस मुक्काम करून निवांत वेळ घालवत इथला अभ्यास करणे.


ऑक्टोबर - जून


1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑक्टोबर - जून

गर्दी नसलेला हंगाम:

1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान बंद

उपक्रम

आपली सहल अविस्मरणीय करण्यासाठी पेंच राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प भेटीत हे उपक्रम आवर्जून करा 

  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • पक्षी निरीक्षण
  • नौकाविहार
  • सफारी
  • पाचधर

पेंच राष्ट्रीय उद्यानात आढळणारे प्राणी