सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

काठी मध्ये पार्क

सविस्तर

सह्याद्री पर्वतरांगांच्या घनदाट जंगल प्रदेशात 2008 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (सामान्यत: एसटीआर म्हणून ज्ञात) तयार करण्यात आला होता. एकूण 1166 किमी इतक्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. 

हा प्रकल्प मराठा साम्राज्याच्या असंख्य ऐतिहासिक घटनांसाठी जगविख्यात आहे. जिथे छत्रपती शिवारायांना भवानी मातेने तलवार देऊ केली त्या मंदिराचे दर्शन घेत व पुढे सातारा संग्रहालयाची भ्रमंती करून आपण स्वराज्याचा इतिहास जाणून घेऊ शकता. ट्रेकर्स आणि निसर्ग प्रेमींसाठी हा प्रकल्प म्हणजे एक पुरेपूर पर्वणी आहे. या प्रकल्पाच्या तीन सफारी क्षेत्रांमध्ये तुम्ही सायकलिंग, बोटिंग, ट्रेकिंग आणि ह्यासारखे बरेच साहसी उपक्रम करू शकता. इथे बिबट्या, मोठी खार, कबुतर, सुतारपक्षी आणि हरीण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. एका साहसी सहलीसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.


ऑक्टोबर - जून


16 जून ते 14 ऑक्टोबर दरम्यान बंद


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

ऑक्टोबर - जून

गर्दी नसलेला हंगाम:

16 जून ते 14 ऑक्टोबर दरम्यान बंद

उपक्रम

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीत हे अनुभव नक्की घ्या

  • जंगल सफारी
  • सायकलिंग
  • ट्रेकिंग
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • नौकाविहार
  • पक्षी निरीक्षण

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात आढळणारे प्राणी