संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबई

सविस्तर

मुंबई मध्ये स्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे राज्यातील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. हे क्षेत्र मुंबईच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20% असून इथे 74 प्रकारचे पक्षी, 170 फुलपाखरू प्रजाती आणि 35 सस्तन प्राणी आढळतात. निसर्गाच्या सानिध्यात क्षणभर विश्रांतीसाठी प्रत्येक वर्षी सुमारे 2 दशलक्ष पर्यटक या उद्यानाला भेट देतात. हे राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या उद्यानांपैकी एक आहे, यात काही शंका नाही. 

उद्यानात प्रवेश करता लगेचच आपण शहरी गोंगाटापासून दूर पक्षांच्या किलबिलाटात आल्याची सुखद जाणीव होते. प्रवेशद्वारापासूनच माकडे व हरीण मुक्तपणे बागडताना दिसून येतात जणू काही ते तुमचे त्यांच्या विश्वात स्वागतच करत असतात. इथे कान्हेरी लेण्यांना भेट देण्यापासून ते वन राणी टॉय ट्रेनमधून प्रवास व तलावातील पॅडल बोटींपर्यंत सगळे काही अनुभवण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढून जायलाच हवे. पक्षी अभ्यासकांसाठी ही जागा जणूकाही स्वर्गच आहे. बांबू हट, कान्हेरी आणि नागाला ब्लॉक ट्रेल्सवर पक्ष्यांच्या विविध प्रजाती शोधण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहे. राष्ट्रीय उद्यान संपूर्ण वर्षभर पर्यटनासाठी सुरु असते म्हणूनच तुम्ही मुंबईत असाल तर उद्यानास भेट देण्याची संधी अजिबात दवडू नका.


सप्टेंबर - मार्च


कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

सप्टेंबर - मार्च

गर्दी नसलेला हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देताना खालील उपक्रम नक्की करून पहा

  • पक्षी निरीक्षण
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • नौकाविहार
  • वाघ आणि सिंह सफारी
  • सायकल चालवणे
  • वन राणी टॉय ट्रेन सफर
  • फुलपाखरू गार्डनला भेट द्या
  • कान्हेरी लेण्यांना भेट द्या
  • गांधी टेकडी स्मारकास भेट द्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळणारे वन्यजीव