ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य

ऐरोली

सविस्तर

दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो स्थलांतरित होत असणारे हे ठाणे जिल्ह्यातील ठिकाण मागील काही वर्षात बरेच चर्चेत आले आहे. ऐरोली येथून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य इथे जाता येते. यापैकी बहुतेक फ्लेमिंगो कच्छ येथून येणारे असतात, तर काही फ्लेमिंगो इराण येथून देखील आलेले असतात असे म्हणतात. याठिकाणी पक्ष्यांच्या 160 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. या खाडीला आयबीएने (IBA) महत्त्वपूर्ण पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.


पाण्यावर उडणारे फ्लेमिंगो पाहण्यासाठी तुम्ही बोटीचा प्रवास करू शकता, मुख्य म्हणजे याचा दुहेरी फायदा असा की योग असल्यास तुम्हाला डॉल्फिनही पाहायला मिळू शकतात. फ्लेमिंगो पाहण्यासाठी उत्तम काळ म्हणजे डिसेंबर ते मे, परंतु याठिकाणी पर्यटन वर्षभर सुद्धा सुरु असते. आपल्यासोबत लहान मुले असल्यास, सागरी वन्य जीवनाबद्दल माहिती देणारे अत्याधुनिक संग्रहालय आवर्जून पहा. पाणवठ्या शेजारून जाणाऱ्या पायवाटांवरून भटकंती करताना विविध प्रकारचे पक्षी तुमची सहल आणखीन सुंदर करतील. याठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.


डिसेंबर - मे

गर्दी नसलेला हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

गर्दीचा हंगाम:

डिसेंबर - मे

गर्दी नसलेला हंगाम:

कधीच नाही, वर्षभर येथे वर्दळ असतेच

उपक्रम

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य सफर परिपूर्ण करण्यासाठी खालील अनुभव नक्की घ्या

  • पक्षी निरीक्षण
  • बोट सफारी
  • निसर्गाच्या सानिध्यात भ्रमंती
  • बांबू पुलावरून सफर
  • किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता संग्रहालयाला भेट द्या!

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात आढळणारे वन्यजीव