पंचगंगा मंदिर

महाबळेश्वर

पंचगंगा मंदिर

महाबळेश्वर

सविस्तर

जुन्या महाबळेश्वरच्या निसर्गरम्य आणि डोंगराळ भागात वसलेले हे मंदिर असून ह्या थंड हवेच्या ठिकाणाच्या (हिल स्टेशनच्या) सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मंदिराच्या आत तुम्हाला विष्णूची मूर्ती, दोन गोमुखे आणि पंचनद्यांची कुंडे दिसतील. नावाप्रमाणेच हे मंदिर कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री ह्या पाच नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी बांधले गेले आहे आणि त्या नद्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीचा यादव राजा सिंघणदेव यांनी बनवले होते. एका दंतकथेनुसार हे मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ह्या त्रिमूर्तींना सावित्रीने दिलेल्या शापाशी निगडित आहे. 16 व्या शतकात, मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचे महत्त्व वाढविले आणि त्याची रचना सुधारण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला. आजतागायत हे मंदिर महाबळेश्वरमधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे आणि दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात.


सकाळी 5 - ते रात्री 9 पर्यंत


फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

वेळः

सकाळी 5 - ते रात्री 9 पर्यंत

उपक्रम

महाबळेश्वर मधील या प्राचीन मंदिराला भेट देताना हेही उपक्रम आवर्जून करा:

  • दोन गोमुखांना भेट देणे
  • नदीचे उगम स्थान पाहणे
  • स्थानिक बाजारपेठेत हस्तकलेची मनसोक्त खरेदी

सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे