UrbsPrima - बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयची सफर

बीएमसी मुख्यालय, मुंबई

UrbsPrima - बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयची सफर

बीएमसी मुख्यालय, मुंबई

सविस्तर

घडयाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या दक्षिण मुंबईत स्थित असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयाची (BMC) इमारत ही एक ऐतिहासिक वास्तूच नव्हे तर मुंबापुरीची एक शाश्वत निशाणी म्हणता येईल. जगभरातील प्रसिद्ध वास्तूंच्या तोडीस तोड अशी ही रचना आजही ठाम उभी आहे . या इमारतीचा पाया 128 वर्षांपूर्वी रचला गेला होता, येथील भिंतींवर मुंबईच्या निर्माणापासून ते विकासापर्यंतच्या प्रवासातल्या असंख्य कथा कोरलेल्या आहेत. महानगरपालिकेने सुरू केलेल्या या अनोख्या उपरोक्त उपक्रमामुळे हा भव्य इतिहास जवळून पाहण्याची सुवर्णसंधी प्रत्येकासाठी उपलब्ध झाली आहे. खाकी टूर्स आयोजित UrbsPrima हेरिटेज वॉक उपक्रम (ऐतिहासिक भ्रमंती) आपल्याला मुंबईतील बहुमजली इमारत बांधकाम क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे दर्शन घडवतो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उदय समजून घेण्याची तसेच बीएमसी कार्यालय इमारतीतील थक्क करणारे घटक जसे की इटालियन शैलीचे सिंह, बदकांच्या नक्षीदार शिल्पाचे कारंजे आणि तरंगत्या पायऱ्यांचा जिना याचे जवळून निरीक्षण करण्याची संधी पर्यटकांना देण्यात येते. हाडाचे मुंबईकर व स्थापत्य अभ्यासकांनी हेरिटेज वॉक रूपात मिळणाऱ्या या संधीचा जरूर लाभ घ्यावा.



फोटो गॅलरी

ठळक मुद्दे

हवामानाचा अंदाज

ठळक मुद्दे

  • महानगरपालिकेचे जनक
  • कार्यालयाविना महापौर
  • बदकांच्या नक्षीदार शिल्पाचे कारंजे
  • मुंबईचे 18 हेडगियर
  • सोनेरी घुमट
  • पाण्याचा छुपा स्रोत
  • इटालियन शैलीच्या सिंहाचे शिल्प
  • तरंगता जिना