एमटीडीसी हरिहरेश्वर

Maharashtra, हरिहरेश्वर
समुद्रकिनारे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
निसर्ग

एमटीडीसी हरिहरेश्वर

Maharashtra
समुद्रकिनारे
वारसास्थळ आणि तीर्थक्षेत्र
निसर्ग

सविस्तर

याठिकाणी काय पाहाल

मुंबईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या हरिहरेश्वरमध्ये आपण हिरव्यागार टेकड्या, प्राचीन मंदिरे, समुद्रकिनारे आणि विस्मयकारक निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीचा अनुभव घेऊ शकता. हरिहरेश्वर मंदिराला स्वतः महादेवांनी आशीर्वाद दिल्याचे मानले जाते म्हणूनच या ठिकाणाला देवघर किंवा "हाऊस ऑफ गॉड" अशीही ओळख आहे. इतकेच नाही तर एकीकडून हरीशांचल व दुसरीकडून पुष्पादरी टेकड्यांनी घेरलेले हे ठिकाण 'हॅम्लेट ऑफ पीस' म्हणजेच शांततापूर्व गाव म्हणून ही ओळखले जाते. या प्रदेशाला दगडांचा अंशही नसलेले दोन समुद्र किनारे लाभलेले असून, एक उत्तरेकडे आणि दुसरा हरिहरेश्वर मंदिराच्या दक्षिणेस आहे. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी किनाऱ्याचे सौंदर्य आणखीन खुलून येते.


रिसॉर्टची वैशिष्ट्य

समुद्राच्या लाटांची गाज ऐकत आपला दिवस सुरु करण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एमटीडीसी हरिहरेश्वर पर्यटक संकूलाला तुम्हाला भेट देता येईल. हे शांततापूर्ण रिसॉर्ट समुद्र किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर आहे. इथे अनेक प्रशस्त हवेशीर जागा असून, बसून तुम्हाला रमणीय निसर्ग पाहता येईल. या रिसॉर्ट मध्येच मायरा उपहारगृह असल्याने स्थानिक चमचमीत, रसदार पदार्थांचा आस्वाद, समुद्राच्या लाटांचा आनंद घेत तुम्हाला घेता येईल. आपल्या मुक्कामासाठी प्रीमियर सूट, कॉटेज, सी फेसिंग असलेले कॉटेज आणि आलिशान सुट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

हरिहरेश्वर समुद्रकिनारा

रिसॉर्ट किनाऱ्याजवळ असून येथील फेसाळ समुद्रकिनाऱ्याची मजा तुम्हाला अनुभवता येईल.

भव्य मंदिर

हरिहरेश्वर मंदिराला भक्तिभावाने भेट देऊन आपल्याला मनाला प्रसन्न करता येईल.

सनराईज आणि सनसेट पॉईंट

रिसॉर्ट मधूनच सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्याचा आनंद घेणे नक्कीच एक मेजवानी ठरेल.

मायरा उपहारगृह

रिसॉर्टच्या बाहेर न पडता स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आणि वैशिष्ट्यपुर्ण पदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येईल.


चेक इन31/03/2025
चेक आउट01/04/2025

Adults

Ages 13 or above

1

Rooms

1

noun_Time_1682979 > चेक इन 11:00 am - चेक आउट 10:00 am >

शुक्रवार आणि शनिवार या दिवसांचे कक्ष दर हे वेगळे आहेत कृपया चेक आऊट करतेवेळी दर तपासून अंतिम आरक्षण करावे.

रिसॉर्टमधील सोयीसुविधा

रिसॉर्टच्या सुविधा

पार्किंग
पॉवर जनरेटर
सुरक्षा
उपहारगृह
  • रिसॉर्टच्या सुविधा

    • पार्किंग
    • पॉवर जनरेटर
    • सुरक्षा
    • उपहारगृह

रिसॉर्टसह संपर्क साधण्यासाठी तपशील

कसे पोहचाल ?

कसे पोहचायचे

  • जवळचे विमानतळः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई (220 किमी)
  • जवळचे रेल्वे स्थानक: माणगाव (65 किमी)

पत्ता : मु. पो. हरिहरेश्वर, ता. श्रीवर्धन, जि. रायगड

मोबाईल क्रमांक : 9503044500

ईमेल आयडी : : harihareshwarmtdc@maharashtratourism.gov.in, roratnagiri@maharashtratourism.gov.in, reservation@maharashtratourism.gov.in



Loading...

Please wait while we fetch the best rooms for you...

सफर अवतीभोवती

कालभैरव मंदिर

900 मी

कालभैरव मंदिर

हरिहरेश्वर टेकडीच्या शिखरावर कालभैरव व शंकर भगवान असे दोन वेगळी मंदिरे आहेत.

हरिहरेश्चर समुद्रकिनारा

1.2 किमी

Harihareshwar Temple

750 मी

गणेश गल्ली

207 किमी

गणेश गल्ली

प्रसिद्ध गणेश गल्लीचा अरुंद रस्ता थेट समुद्राच्या तटावर नेतो. इथून ओहोटीच्या वेळी तुम्ही जवळजवळ तीस फूट खोल असलेल्या गणेशाची सुंदर मूर्ती पाहू शकता.